Thursday, 20 February 2014




खरे प्रेम कोणते ? पुराणात अनंत उद्धरणे आणि उदाहरणे आढळतात 
श्रीकृष्ण याचे प्रेम निर्व्याज, अढळ आणि उदात्त असे होते 

त्यावर एक प्रेम कविता, लोकप्रभेच्या वाचकांसाठी 

प्रेम 

प्रेम हवे कसे ?
राधा कृष्णाचे होते तसे 

तशी हि आहे जुनी कथा,
पण ऐकली कि दूर होतात व्यथा 

रुख्मिणी दाबत होती कृष्णाचे पाय,
पाहून तळव्यावर फोड, ती चित्कारली, नाथ हे काय ?

श्रीकृष्ण फक्त हसले,
"काही नाही" असे बोलले 

रुख्मिणीने पुन्हा पुन्हा विचारल्यावर,
अग ! हा तर मत्सर, भगवंतांनी दिले उत्तर 

जेंव्हा राधा येथे राहण्यास आली,
तेंव्हा तिची जबाबदारी तू घेतली

दिले तिला दुध, ते होते गरम,
तू विसरलीस कि तिच्या रुधयात नांदतात आमुचे चरण 

ती तर पिवून गेली, ते दुध गोड,
पण तुझा मत्सर, बनला पायाचे फोड 

सुरेश कुलकर्णी, इंदूर, मध्य प्रदेश 

No comments:

Post a Comment